Mukundnagar, Gultekdi Pune - 411037, India
tmvshaleyaprasar@gmail.com
०२०-२४४०३०४३/९०/९९७५१९२७६५

About Us

टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे आपणांस शुभेच्छा!

शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी तसेच इंग्रजी, गणित, विज्ञान इ. विषयांच्या अभ्यासाचा त्यांचा पाया पक्का व्हावा या हेतूने दरवर्षी इंग्रजी, गणित, संस्कृत, मराठी भाषा इ. विषयांच्या परीक्षा वर्षातून फेब्रुवारी/सप्टेंबर या महिन्यात विद्यापीठांतर्गत विद्या प्रसारक मंडळ स्थापन करून परीक्षांचे नियोजन केले जाते. या परीक्षांचा अभ्यासक्रम शासनाने तयार केलेल्या शालेय अभ्यासक्रमास उपयुक्त व पूरक असल्याने या परीक्षांचा अभ्यासक्रम शासनाने तयार केलेल्या शालेय अभ्यासक्रमास उपयुक्त व पूरक असल्याने या परीक्षा विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय झाल्या.तसेच शालान्त परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या या परीक्षांचा उपयोग शालांत परीक्षेच्या तयारीसाठी झाल्याचे अभिमानाने आवर्जुन नमूद केलेले आहे. गेली अनेकवर्षे शालेय विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्याचे काम या परीक्षांच्या माध्यमातून विद्यापीठ करीत आहे.सर्व विषयांच्या प्रत्येक परीक्षेस प्रथम क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यास मार्गदर्शन करणाऱ्या विषय शिक्षकांना विशेष प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते.
लोकमान्य बाळ गंगाधर यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त वक्तृत्वत्तेजक सभा व टिळक स्मारक मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.या स्पर्धांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मा. कुलगुरू डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आली. २००५-२००६ पासून सुरू केलेला उपक्रम दरवर्षीप्रमाणे लोकमान्य पुण्यतिथीला वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन केले जाते.

प्रमुख वैशिष्ठये

टिळक महाराष्ट्र विद्यापीठ गेली १० दशके शालेय विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबवत आहे शालेय अभ्यासक्रमास अनुलक्षून घेण्यात येणाऱ्या विविध विषयांच्या परीक्षा हया त्यापैकीच एक उपक्रम होय. विद्यार्थ्यांना अवघड वाटणाऱ्या विषयांचा पाया अधिक पक्का व्हावा, त्यांचे सातत्यपूर्ण व सर्वकष मूल्यमापन व्हावे व त्यांच्या गुणवत्तेत वाढ व्हावी या उद्देशाने या परीक्षांची आखणी करण्यात आलेली आहे. त्यामुळेच या परीक्षा शाळा, विद्यार्थी व पालक वर्गाध्ये मान्यता पावल्या आहेत. या परीक्षांना आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभेल अशी अपेक्षा आहे.

शालेय परीक्षांची वैशिष्ट्ये

दरवर्षी महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील सुमारे २००० पेक्षा जास्त शाळांमधून लाखांहून अधिक विद्यार्थी विद्यापीठाच्या शालेय परीक्षांना बसतात. विविध विषयांच्या इ.४थी ते १०वी साठी जवळपास ९० परीक्षा वर्षातून दोन सत्रांत घेतल्या जातात

आकर्षक पारितोषिके -

विविध विषयांच्या प्रत्येक परीक्षांमध्ये एकूण विद्यार्थ्यांध्ये गुणानुक्रमे पहिल्या दोन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना आकर्षक पारितोषिके देण्यात येतात. तसेच सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे दिली जातात. सर्व विषयांच्या प्रत्येक परीक्षेस प्रथम क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांस मार्गदर्शन करणाऱ्या विषय शिक्षकांना विशेष प्रमाणपत्र देऊ न गौरविण्यात येते.

अध्यापक मानधन -

शाळांना परीक्षा व्यवस्थेसाठी होणारा सर्व खर्च व परीक्षांसाठी मार्गदर्शन करणाऱ्या शाळेतील अध्यापकांना मानधन म्हणून साधारणतः परीक्षा शुल्काच्या २५% इतकी रक्कम दिली जाते. त्यामुळे शाळेला कोणताही आर्थिक बोजा सहन करावा लागत नाही. जपानी भाषा प्रमाणपत्र परीक्षा व मार्गददर्शन- शाळेच्या मागणीनुसार विद्यापीठातर्फे जर्मन व जापनीज भाषेच्या मार्गदर्शनासाठी मागणीनुसार माफक शुल्क आकारुन सी.डी. द्वारा शैक्षणिक साहित्य दिले जाते (अधिक माहितीसाठी विद्यापीठाशी संपर्क साधावा.) जर्मन व जापनीज भाषेच्या प्रत्येकी ४ परीक्षा घेतल्या जातात.

Sufficient Classrooms

मराठी व इगं्रजी माध्यमाच्या स्पर्धेसाठी प्रत्येक गटास खालीलप्रमाणे रोख पारितोषिके देण्यात येतात. प्रथम क्रमांक रु.१०००/-द्वितीय क्रमांक - रु.७००/- तृतीय क्रमांक -रु.५००/- उत्तेजनार्थ - रु.३००/- विभागून. सर्व सहभागी स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येते तसेच सर्व गटांत मिळून जास्तीत जास्त क्रमांक मिळविणाऱ्या शाळेस सर्वसाधारण विजेतेपद दिले जाते. अशा शाळेस स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येते. सस्ंकृत व हिंदी माध्यमाच्या स्पर्धेची पारितोषिके स्पर्धेच्या वेळोवेळी जाहिर करण्यात येणार आहेत.

20 Years of Experience

Separated they live in. A small river named Duden flows by their place and supplies it with the necessary regelialia. It is a paradisematic country

0 Certified Teachers
0 Successful Kids
0 Happy Parents
0 Awards Won